व्यवस्थापन (२०१५ - २०२०)
ग्रंथालयाची नोंदणी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्टमधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे. ग्रंथालयाच्या कामकाजावर राज्य ग्रंथालय संचालक यांचे नियंत्रण असून राज्य शासनाने ग्रंथालयास ‘अ’ वर्ग तालुका वाचनालय असा दर्जा दिला आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड पाच वर्षाच्या कालावधीसाठी सभासदांकडून केली जाते. स्वीकृत सदस्यांची निवड कार्यकारी मंडळातर्फे केली जाते.