विविधांगी कार्यक्रम व स्पर्धा / Event & Competitions

प्रासंगिक कार्यक्रम व स्पर्धा


वाचनालयातर्फे वर्षभर सातत्याने अनेक उपक्रम पार पाडले जातात. प्रासंगिक कार्यक्रमाव्यतिरिक्त दरवर्षी नियमितपणे साजरे केले जाणारे उपक्रम –

१. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स्वरप्रभात व दीपावली पाडव्यानिमित्त स्वरदिपोस्तव.

२. लोकमान्य टिळक पुण्यातिथीनिमित्त आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा.

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय (माध्यमिक शालांतर्गत) वक्तृत्व स्पर्धा.

४. महाविद्यालयीन, माध्यमिक, प्राथमिक व बालवाडी स्तरांवरील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

५. रामभाऊ आपटे पुण्यतिथीनिमित्त (प्राथमिक शालांतर्गत) कथाकथन स्पर्धा.

६. एप्रिल महिन्यात बाल वाचक संस्कार शिबीर व पुस्तक हंडी.

७. ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त समयोजित कार्यक्रम.

८. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन.

९. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम.

१०. नवीन खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन.