मान्यवरांच्या भेटी व अभिप्राय
ग्रंथालयाच्या इतिहासात आजवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन वाचनालयाची ग्रंथसंपदा व उपक्रमांचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे. देशभरातून अनेक अभ्यासक संदर्भासाठी ग्रंथालयाकडे येतात.
परिसरात अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेले मान्यवर ग्रंथालयास आवर्जून भेट देतात. त्यामध्ये मोरारजी देसाई, न्या. वाय. व्ही. चंद्रचूड, दत्तो वामन पोतदार, वि. स. पागे, नरुभाऊ लिमये, आचार्य दादा धर्माधिकारी, श्रीमती दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, ग. प्र. प्रधान, गंगाधर गाडगीळ, ग. त्र्यं. माडखोलकर, पु. भा. भावे, राम शेवाळकर, श्री. ज. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. यु. म. पठाण, वसंत भालेराव, पां. वा. गाडगीळ, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब भारदे, देवदत्त दाभोलकर, रणजीत देसाई, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, वसंत बापट, नारायण सुर्वे, शांता शेळके, माधव गोडबोले, मंगेश पाडगावकर, प्रकाश आमटे, विठ्ठलराव गाडगीळ, सुधाकरराव नाईक, वसंत कानेटकर, अहिल्या रांगणेकर, शरद तळवळकर, शांताराम, दया पवार, इंदिरा संत, श्री. पु. भागवत, रामदास फुटाणे, रमाकांत खलप, रमेश पतंगे, चंद्रशेखर धर्माधिकारी,प्रकाश जावडेकर, कृ. रा. कणबरकर, पद्मजा फेणाणी- जोगळेकर, भक्ती बर्वे- इनामदार, राजीव दिक्षित, अरुण निगवेकर, वीणा देव, रामदास भटकळ, रत्नाप्पा कुंभार, विश्वास नांगरे-पाटील आदी मान्यवरांचा उल्लेख करावा लागेल.