बालविभाग
बालवयात वाचनाची गोडी लागावी यासाठी ग्रंथालय विशेष प्रयत्नशील असून त्यासाठी बालविभागाची रचना वैशिष्ठ्यपूर्ण करण्यात आलेली आहे. बाल व किशोरवयीन मुलांसाठी खास बैठक व्यवस्था, ज्ञान व मनोरंजनाचा मेल साधणारे वाचन साहित्य व नाममात्र शुल्क यामुळे हा विभाग बाल वाचकांचे आकर्षण ठरला आहे.
त्यांच्या बैठकीकरिता खास छोट्या आकाराच्या टेबल खुर्च्याची मांडणी करून त्यांच्यासाठी पौराणिक व ऐतिहासिक कथा, कॉमिक्स, शौर्यकथा, बोधकथा, इसापनीती,अरेबियन नाईट्स, संस्कार कथा, वैज्ञानिक शोध आणि वैज्ञानिकांच्या गोष्टी तसेच समाजसुधारक, संत कथा आदि मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. मुलांना मुक्तपणे वावरता यावे आणि स्वतः एखादे पुस्तक मिळवून वाचता यावे अशी सुविधा करण्यात आली आहे. विशेषतः शाळांच्या सुट्ट्यांच्या वेळी बालवाचकांनी हा विभाग गजबजून जातो. अनेक मान्यवरांनी व जाणकारांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. हा विभाग अधिक समृद्ध करण्याबाबत ग्रंथालय प्रयत्नशील आहे.