भविष्यातील योजना / Future plans

भावी योजना


ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी विविध योजना सातत्याने हाती घेतल्या जातात. ग्रंथालयाचे संगनिकीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे सभासदांना अधिक तत्परतेने सेवा देण्यात येत आहे. इन्टरनेट सुविधा कार्यान्वित इ-बुक्स, दुर्मिळ व ऐतिहासिक पुस्तकांचे स्कॅनिंग करणे, डिजिटल स्वरुपात त्याचे जतन करणे, बारकोडींग इत्यादी उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहन दिले जात आहे. फिरते ग्रंथालय योजना राबवण्याबाबत वाचनालयाचे प्रयत्न आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेषतः प्राथमिक शाळांमध्ये ग्रंथांचे, पुस्तकांचे आदानप्रदान होत रहावे यासाठीही ग्रंथालय प्रयत्नशील आहे. बाल वाचक विभाग अधिक समृद्ध करण्यासाठी अभिनव महत्वकांक्षी संकल्पनांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. आधुनिक काळाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन विचाराधीन आहे.

ग्रंथालयातर्फे सध्या दिल्या जाणाऱ्या साहित्यकृती पुरस्कारांची व्याप्ती वाढावी आणि स्वतःचे ऑडिटोरीयम-कम-मिनी-थिएटर असावे अशीही ग्रंथालयाची योजना आहे. स्वतःचे प्रकाशनगृह असावे व त्याद्वारे नियतकालिके आणि पुस्तकांचे प्रकाशन व्हावे हा सुद्धा ग्रंथालयाचा एक भावी संकल्प आहे.