देणगी व सन्मान
अनेक साहित्यप्रेमींनी ग्रंथसंपदा व चित्रसंपदा ग्रंथालयास दान केली आहे. इन्फोसिसच्या मा. सुधा मूर्ती यांनी फाय फौन्डेशन पुरस्काराची रु. २ लाखाची रक्कम ग्रंथालयास देणगी म्हणून दिली. ग्रंथालयाचे सभासद श्री. म. न. भावे मामा यांनी ग्रंथ खरेदीसाठी रु. १ लाखाची तर इचलकरंजीचे उद्योगपती मा. श्री. पंडितराव कुलकर्णी यांनी यांच्या कंपनीतर्फे रु. १.२५ लाखाची देणगी संगनिकीकरणासाठी दिली. शासनाने १०० वर्षापेक्षा जुने समृद्ध ग्रंथालय म्हणून ५ लाख रुपयाचे विशेष अनुदान व पुरस्कार दिला आहे.
वाचनालयाच्या विविध उपक्रमांसाठी अनेक दानशूर वाचनप्रेमी व्यक्ती, सभासदांनी तसेच परिसरातील सहकारी संस्था, उद्योजक-व्यापारी यांनी सढळ हातांनी मदत केली आहे. त्यात प्रामुख्याने बजाज फौंडेशन, खासदार मनोहर जोशी, खासदार बाळ आपटे, श्री. एस. व्ही. कुलकर्णी, शीतल मणेरे यांचा उल्लेख करावा लागेल. वाचनालयाचे सभागृह बांधकामासाठी राजा राममोहन राय फौंडेशनने भरीव अर्थसहाय्य केले. राज्य शासनाने विशेष अनुदान व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारही वाचनालयास प्रदान करण्यात आला आहे.
ग्रंथालयास प्राप्त झालेले पुरस्कार
# | वर्ष | पुरस्काराचे नाव | पुरस्कार देणारे |
---|---|---|---|
१ | १९९०-१९९१ | .डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार | महाराष्ट्र शासन मुंबई |
२ | १९९७ | उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार | कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ |
३ | १९९०-२००० | इचलकरंजी शहरातील कृतज्ञता गौरव पुरस्कार | रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व श्री दगडूलाल मर्दा ट्रस्ट |
४ | २०००-२००१ | शातकोत्तर रौप्यमहोत्सवी सर्वश्रेष्ठ ग्रंथालय | लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी |
५ | २०११ | उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार | श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा |
६ | २०१५ | सामाजिक पुरस्कार | इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ |
७ | शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष | मराठी ग्रंथ संग्रालय, ठाणे |