संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका / Reference Library & Study

संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका विभाग


ग्रंथालयाने आजवर जपलेले अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक ग्रंथ या विभागात उपलब्ध आहेत. या विभागातील संशोधनपर पुस्तके, विविध कोश, विश्वकोशाचे सर्व खंड, विवेकानंद ग्रंथावली, स्पिरीट ऑफ इंडिया, महात्मा गांधी चरित्र खंड, मराठी रियासत, प्राचीन धार्मिक ग्रंथ, पंचांग, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एनसाय्क्लोपेडीया ब्रिटानिक, ऐतिहासिक ग्रंथ, नकाशे हि या ग्रंथालयाचे भूषण असून अनेक संशोधक, अभ्यासक व जिज्ञासू वाचकांना नाममात्र शुल्क देऊन ग्रंथसंपदेचा लाभ घेता येतो. विशिष्ठ माहितीच्या छायाप्रती मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जातात. स्वतंत्र दालन, शांत वातावरण, अमुल्य ग्रंथसंपदा हाताळण्याची पूर्ण मुभा आणि बैठकीची उत्तम व्यवस्था यामुळे या विभागाचा अनेक अभ्यासू विद्वान मंडळी व पी. एच. डी. करणारे विद्यार्थी लाभ घेतात. एखाद्या पुस्तकातील विशिष्ठ भागाचे झेरॉक्स हवे असल्यास ते काढून देण्याची सोयही आहे.