साहित्यकृती पुरस्कार / Literature Awards

साहित्यकृती पुरस्कार


१९९५ साली ग्रंथालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव प्रसंगी आदरणीय कवयित्री इंदिरा संत यांनी ग्रंथालयास भेट दिली. येथील ग्रथसंपदा, ग्रंथालयाचा इतिहास व विविध उपक्रम पाहून त्यांनी स्वेच्छेने ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारले व देणगीही दिली. इंदिरा संतांच्या या भेटीची स्मृती चिरंतन राहावी या उद्देशाने त्यांनी दिलेल्या देणगीतून प्रतिवर्षी वाचनालयातर्फे उत्कृष्ठ काव्यसंग्रहास इंदिरा संतांच्या नावे पुरस्कार देण्याच्या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट तसेच शहरातील ग्रंथप्रेमिंच्या उदार अर्थसहाय्यामुळे कथासंग्रह, कादंबरी, ललित गद्य, मराठ गद्य, अनुवाद, बालसाहित्य तसेच लक्षणीय गद्य व पद्य अशा विविध विभागातील पुस्तकांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात.

आपटे वाचनालयाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवोदित लेखकांची पुस्तके येतात. स्वतंत्र परीक्षक नेमून ग्रंथांचे परीक्षण केले जाते व त्या त्या वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येतो. मराठी साहित्य जगतात या पुरस्कारांनी आपले वैशिष्ठ्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. मराठी साहित्य जगतात आपटे वाचन मंदिराचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे समजले जातात.

इंदिरा संत उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार

# वर्ष काव्यसंग्रह कवि
१९९८ जावे जन्माकडे अरुणा ढेरे
१९९९ पुनर्जन्म मीरा तारळेकर
२००० गर्भागार शंकर रामाणी
२००१ जीवनायण यशवंत मनोहर
२००२ .... आणि तरीही मी! किशोर कदम
२००३ तूर्तास प्रा. दासू वैद्य
२००४ दहशतीची दैनंदिनी डॉ. सुहास जेवळीकर
२००५ आवानओल अजय कांडर
२००६ संभ्रम सावल्या शोभा रोकडे
१० २००७ दारातल्या रांगोळीचे रंग सिसिलिया कार्व्हालो
११ २००८ स्वप्नसंहिता यशवंत मनोहर
१२ २००९ सांजचकवा अशोक गुप्ते
१३ २०१० सम्भवा किशोर पाठक
१४ २०११ भुईशास्त्र ऐश्वर्य पाटेकर
१५ २०१२ हत्ती इलो अजय कांडर
१६ २०१३ तिसरा डोळा हेमंत जोगळेकर
१७ २०१४ परतीचा रस्ता नाहीय श्रीधर नांदेडकर
१८ २०१५ मम म्हणा फक्त वीरधवल परब
१९ २०१६ काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान गणेश शिवाजी मरकड
२० २०१७ हरवल्या आवाजाची फिर्याद मा. रावसाहेब कुवर
२१ २०१८ संपर्कक्षेत्राच्या बाहेर रवींद्र लाखे

साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कृत उत्कृष्ठ गद्य पुरस्कार

# वर्ष गद्य लेखक
१९९८ माती, पंख आकाश ज्ञानेश्वर मुळे
१९९९ सांजरंग नामदेव कांबळे
२००० आंधळयांच्या गायी मेघना पेठे
२००१ पंखा प्रकाश संत
२००२ खूप लोक आहेत श्याम मनोहर
२००३ गंगेमध्ये गगन वितळले अंबरीश मिश्र
२००४ कवडसे पकडणारा कलावंत विजय पाडळकर
२००५ ड्रगन जागा झाल्यावर अरुण साधू
२००६ तोच मी ! प्रभाकर पणशीकर
१० २००७ आधुनिक समीक्षा – सिद्धांत मिलिंद मालशे
११ २००८ सोनाटा आणि एका नटाचा मृत्यू महेश एलकुंचवार
१२ २००९ शोध मर्ढेकरांचा विजया राजाध्यक्ष
१३ २०१० आपले विचारविश्व के. रं. शिरवाडकर
१४ २०११ परामर्श: सहा प्रस्तावना प्रा. राम बापट
१५ २०१२ झिम्मा.. आठवणींचा गोफ विजया मेहता
१६ २०१३ निर्मिती: दो ऑंखे बारह हाथ प्रभाकर पेंढारकर
१७ २०१४ अजुनी चालतोची वाट.. जीवन आणि कार्य रावसाहेब शिंदे भानू काळे
१८ २०१५ संतवाङ्मयाचे जनसाहित्यमूल्य डॉ. सुभाष सावरकर
१९ २०१६ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा भानू काळे
२० २०१७ ज्ञानपीठ लेखिका मा. मंगला गोखले
२१ २०१८ एक साहित्यिक प्रवास डॉ. आनंद यादव

इंदिरा संत विशेष लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार

# वर्ष काव्यसंग्रह कवि
१९९८ मृगतृष्णा संगिता बर्वे
रंगहोळी अनिल कांबळे
१९९९ मी एक दर्शनबिंदू आसावरी काकडे
तेजस्वला ज्योत्स्ना चांदुगडे
२००० अरुणचंद्र गवळींच्या कविता अरुणचंद्र गवळी
येरू म्हणे प्रवीण बांदेकर
२००१ मौनातील पडझड अशोक कोतवाल
माझ्या आत्म्याच्या चुंबकीय परिघात भगवान ठग
२००२ एकांताचा दिवा सतीश सोळांकूरकर
अंतरीचा दिवा प्रदीप पाटील
२००३ भ्रमिष्टाचा जाहीरनामा संतोष पवार
कुणब्याची कविता लक्ष्मण महाडिक
२००४ टाहो इंद्रजीत भालेराव
नांदी राजेंद्र शेंडगे
२००५ शरणागताचे स्रोत शशिकांत शिंदे
प्रकाशाचे अंग डॉ. नीलिमा गुंडी
२००६ शुभ्र कमळांचे तळे मनोहर रणपिसे
आभाळाचे पंख निळे श्रीराम पचिंद्रे
१० २००७ पायपोळ सचिता खल्लाळ
आतबाहेर सर्वत्र विजय चोरमारे
११ २००८ मृगजळीचा मासा कविता महाजन
निरन्तर उषा मेहता
१२ २००९ मनाचिये गुंफी यशोधरा साठे
पुन्हा चाल करू या...! लोकनाथ यशवंत
१३ २०१० मेलं नाही अजून आभाळ बालाजी इंगळे
बाईच्या कविता किरण येले
१४ २०११ सोंग घेऊन हा पोर रफिक सूरज
सरवा श्रीधर शनवारे
१५ २०१२ कल्लोळातला एकांत अजीम नवाज राही
तळ ढवळताना लहू कानडे
१६ २०१३ कबुतरखाना महेश कराडकर
गाव आणि शहराच्या मधोमध पृथ्वीराज तौर
१७ २०१४ सेनं सायी वेस वीरा राठोड
खचू लागली भुई नीलम माणगावे
१८ २०१५ अंधारडोह बनत जाताना प्रमोद मनोहर कोपर्डे
अंतर्नेत्र सुदेश शरद लोटलीकर
१९ २०१६ शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..! सुशीलकुमार शिंदे, ठाणे
पाथेय ल. सि. जाधव
२० २०१७ नोंदीनांदी मा. फेलिक्स डिसोझा
मरी मरी जाय सरीर मा. योजना यादव
२१ २०१८ माझ्यातला कवी मरत चाललाय... इरफान शेख
हरवलेल्या कवितांची वही संजय पाटील

विशेष लक्षणीय गद्य पुरस्कार

# वर्ष गद्य लेखक
१९९८ महानायक विश्वास पाटील
तणकट राजन गवस
१९९९ धुके श्रीरंग जोशी
कंदिलाचा उजेड वसंत पाटील
२००० आठवणींचा मोहोर राजाभाऊ गवांदे
सेतू आश बगे
२००१ समिधा साधना आमटे
तो प्रवास सुंदर होता के. रं. शिरवाडकर
२००२ गार्गी अजून जिवंत आहे मंगला आठलेकर
राजधानीतून अशोक जैन
२००३ चीनीमाती मीना प्रभू
झाशीची राणी लक्ष्मिबाई झाशीची राणी लक्ष्मिबाई
२००४ तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा योगिराज बागूल
दक्षिण आफ्रिका : गाथा स्वांतंत्र्याची बाल राणे
२००५ चकवाचांदण एक वनोपनिषद मारुती चितमपल्ली
बॅरिस्टरच कार्ट डॉ. हिम्मतराव बावस्कर
२००६ मराठीतील आत्मचरित्रपर लेखन उषा हस्तक
समग्र झाडीपट्टी हिरामण लांजे
१० २००७ निःशब्द झुंज रेणू गावस्कर
झगडा रामचंद्र नलावडे
११ २००८ नॉट गॉन विथ द विंड विश्वास पाटील
धर्म आणि धम्म अविनाश सहस्त्रबुद्धे
१२ २००९ छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाकाव्य रचना डॉ. स्नेहल तावरे
जीएंची कथा: परीसयात्रा अ. रा. यार्दी / वि. गो. वडेर
१३ २०१० लिओनार्दो – बहुरूपी प्रतिभावंत दीपक घारे
आविष्कार: आधुनिक वास्तुकलेचे अशोक म. वाडकर
१४ २०११ समीक्षामीमांसा गंगाधर पाटील
पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान निळू दामले
१५ २०१२ विश्वाचे आर्त अतुल देऊळगावकर
अकथ कहाणी सद्गुणांची ममोज बोरगावकर
१६ २०१३ शोधयात्रा विदुर महाजन
पुस्तक उघडलं सुमेध वडावाला (रिसबूड)
१७ २०१४ भारतातील मुस्लिम स्थापत्यकला
मेळघाटातील मोहर मृणालिनी चितळे
१८ २०१५ तथागत बुद्ध चरित्र आणि तत्त्वद्न्यान डॉ. प्रशांत गायकवाड
प्रेरणा – द साउंड ऑफ सायलेन्स डॉ. उज्ज्वला सहाणे
१९ २०१६ मन में है विश्वास विश्वास नांगरे पाटील
जू ऐश्वर्य पाटेकर
२० २०१७ बखर संस्थानांची मा. सुनीत पोतनीस
शपेतले आकाश मा. श्रीनिवास नी. माटे
२१ २०१८ मराठीतील कलावादी समीक्षा डॉ. वि. दा. वासमकर
कासवांचे बेट डॉ. संदीप श्रोत्री

कै.सौ.आशाताई सौंदत्तीकर कथासंग्रह पुरस्कार

# वर्ष कथासंग्रह लेखक
२००३ आभाळपक्षी मंदाकिनी गोडसे
२००४ मातीची सावली स्टनली गोन्सालविस
२००५ डोलकाठी आणि इतर कथा यशवंत पाठक
२००६ एक आणि दोन आणि .... वैशाली परांजपे
२००७ केवल कांचन तारा वनारसे
२००८ विश्वनाथ मधुकर धर्मापुरीकर
२००९ डेड एन्ड पंकज कुरुलकर
२०१० अशी वेळ सानिया
२०११ शिल्प मोनिका गजेंद्रगडकर
१० २०१२ डालांग योगिनी वेंगुर्लेकर
११ २०१३ बेबस रफिक सुरज
१२ २०१४ बंद दरवाजा भारत सासणे
१३ २०१५ निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा प्रणव सखदेव
१४ २०१६ न रडणारी मुलगी सुप्रिया अय्यर
१५ २०१७ सांजपर्व मा. अंजली दिवेकर
१६ २०१८ सांजसावल्या डॉ. राजेंद्र माने

स्थानिक साहित्यिक गौरव पुरस्कार

# वर्ष साहित्य लेखक
२००३ गझलांकित प्रसाद कुलकर्णी
२००४ तुझीच डॉ. जयपाल गिरमल
२००५ माझी क्रांतीव्रताची साधना शांतारामबापू गरुड
२००६ ऐतिहासिक साहित्य रमेश शांतीनाथ भिवरे
२००७ डी.के.टी.ई. सोसायटी वस्त्रकोश प्रकाशन
२००८ शाहिरी वाङ्मय राजाराम जगताप
२००९ हिंदी साहित्य वैशाली नाईकवडे
२०१० श्री. आ. क. कुरुंदवाडे
२०११ शाहीर विजय जगताप
१० २०१२ प्रा. श्री. सुरेश महाजन
११ २०१३ प्रा. डॉ. दीपक चव्हाण
१२ २०१४ श्री. रामचंद्र ढेरे
१३ २०१५ श्री. प्रसाद ताम्हणकर
१४ २०१६ श्री. अण्णा राजापुरे
१५ २०१७ श्री. अशोक जाधव
१६ २०१८ अ‍ॅड. माधुरी काजवे

केराबाई शेळके कादंबरी पुरस्कार

# वर्ष कादंबरी लेखक
२००४ इन्किलाब विरुद्ध जिहाद लक्ष्मिकांत देशमुख
२००५ बाकी शून्य कमलेश वालावकर
२००६ एका मारवाड्याची गोष्ट गिरीश जाखोटिया
२००७ पडघम रवींद्र शोभणे
२००८ त्या वर्षी शांता गोखले

उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार

# अनुवाद लेखक
थैलीभर गोष्टी सुधा मूर्ती / अनु. लीना सोहोनी
अदम्य जिद्द डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – अनु. सुप्रिया वकील
माझे आशावादी अनुमान डॉ. वसंत गोवारीकर / अनु. सुधा गोवारीकर
नंदकुमार बंडगरकर

शामराव भिडे ललित गद्य पुरस्कार

२००९ ग्राफिटी वोल कविता महाजन
२०१० घर वाऱ्याचे पाय पाऱ्याचे दिलीप पांढरपट्टे
२०११ प्रास विष्णु जयवंत बोरकर
२०१२ चित्रव्यूह अरुण खोपकर
२०१३ चांदण्याचा रस्ता प्रकाश नारायण संत
२०१४ संगीत बारी भूषण कोरगांवकर
२०१५ ‘ते’ आणि ‘मी’ शकुंतला पुंडे
२०१६ आठवणीतील दवबिंदू कर्नल अरविंद वसंत जोगळेकर
२०१७ संघर्ष आणि शहाणपण मा. नरेन्द्र चपळगावकर
१० २०१८ बारा मतीची माणसं प्रकाश राणे

पार्वती शंकरराव तेलसिंगे बाल साहित्य पुरस्कार

२००९ वनात... जनात अनिल अवचट
२०१० हुर्रेहूप संगीता बर्वे
२०११ सृजनपंख डॉ. पृथ्वीराज तौर व प्रा.स्वाती काट
२०१२ शिवगाथा सूर्यकांत मालुसरे
२०१३ तळ्यातला खेळ एकनाथ आव्हाड
२०१४ हळू गळू, पळू गळू व इतर कथा म. वि. कोल्हटकर
२०१५ बदल विद्यालंकार घारपुरे
२०१६ मनात आहे पुष्कळ पुष्कळ उत्तम कोळगावकर
२०१७ प्रकाशाचा दिवा मा. गणेश भाकरे
१० २०१८ जॉयस्टिक सोनाली नवांगुळ

वि. मा. शेळके (गुरुजी) उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार

२००९ चाळेगत प्रवीण बांदेकर
२०१० कुंधा अशोक कोळी
२०११ तपोवन प्रभाकर पेंढारकर
२०१२ थैमान रामचंद्र नलावडे
२०१३ खरडछाटणी नामदेव माळी
२०१४ धूळमाती कृष्णात खोत
२०१५ नामशेष होणारा माणूस जयसिंग पाटील
२०१६ बगळा प्रसाद कुमठेकर
२०१७ फेसाटी मा. नवनाथ गोरे
१० २०१८ वाळवाण रवी राजमाने

महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार

२००९ माझे आशावादी अनुमान सुधा गोवारीकर
२०१० भयशुन्य चित्त जेथ... डॉ. नरेंद्र जाधव
२०११ लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र – मिलिंद चंपानेरकर
२०१२ आमचं जगणं आमचं लिहिणं नीला चांदोरकर
२०१३ मनगंगेच्या काठावर सविता दामले
२०१४ गुड मुस्लीम बड मुस्लीम पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर
२०१५ पारखा उमा कुलकर्णी
२०१६ भारताचे लष्करी संघर्ष आणि राजनय माधव गोखले
२०१७ स्वयं प्रकाश: निवडक कथा मा. बलवंत जेऊरकर
१० २०१८ डीपटी कलक्तरी अनुवाद तथा अनुभव मधुकर धर्मापुरीकर

साहित्य पुरस्कार सोहळ्याचे सन्माननीय पाहुणे व परीक्षक

सन प्रमुख पाहुणे परीक्षक
१९९८ ना. सं. इनामदार (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) प्रा. म. द. हातकनंगलेकर
२००० विजया राजाध्यक्ष (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा) श्रीनिवास वि. कुलकर्णी , प्रा. अनुराधा गुरव
२००२ सुभाष भेण्डे (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) विजया राजाध्यक्ष , मधु मंगेश कर्णिक
२००४ प्रा. केशव मेश्राम (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) अनंत मनोहर , अरुणा ढेरे
२००६ अरुण साधू (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) डॉ. द. भि. कुलकर्णी , वैजनाथ महाजन , वसंत केशव पाटील
२००८ प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे (अध्यक्ष – विश्व मराठी साहित्य संमेलन) राजन गवस, उमा कुलकर्णी, लीना सोहोनी, तारा भवाळकर, दत्ता हसलगीकर, वसंत के. पाटील
सन प्रमुख पाहुणे परीक्षक
१९९९ वसंत बापट (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) प्रा. ल. रा. नासिराबादकर ,
प्रा. डॉ. आनंद यादव
२००१ मधु मंगेश कर्णिक (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) प्रा. म. द. हातकनंगलेकर ,
श्रीनिवास वि. कुलकर्णी
२००३ भारतकुमार राऊत
(संपादक – महाराष्ट्र टाईम्स)
सरोजिनी वैद्य
२००५ प्रा. डॉ. निर्मलकुमार फडकुले (सुप्रसिध्द साहित्यिक व विचारवंत) डॉ. सुभाष भेण्डे , अरुणा ढेरे ,
तारा भवाळकर
२००७ प्रा. म. द. हातकनंगलेकर (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) शिवशंकर उपासे, सुधीर मोघे,
श्रीरंग वि. जोशी , अरुण साधू
२००९ प्रा. द. भि. कुलकर्णी (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) प्रा. डॉ. मंदा कदम, सुप्रिया वकील,
प्रा. डॉ. वा. पु. गिंडे, रजनी हिरळीकर,
डॉ. ल. रा.नसिराबादकर, प्रा. विष्णू वासिमकर, प्रा. डॉ. महेंद्र कदम