पुस्तक देवघेव विभाग
पहिल्या मजल्यावरील प्रशस्त दालनात वाचकांसाठी पुस्तक देवघेव विभाग कार्यरत असून संगणकाच्या सहाय्याने वाचकांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.पुस्तकांची निवड करण्याची त्यांना पूर्ण मुभा असते. जिज्ञासू वाचकांना ग्रंथालयाचे कर्मचारी हवे ते पुस्तक मिळवून देण्यास तत्पर असतात. दररोज सरासरी ४००-४५० वाचक पुस्तकांची देवघेव करण्यासाठी ग्रंथालयास भेट देतात. या दालनातील ख्यातनाम मराठी साहित्यिकांची छायाचित्रे वाचकांचे लक्ष वेधून घेतात.